राष्ट्रसंत श्री भगवान बाबा : पुण्यतिथीनिमित्त वालूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

राष्ट्रसंत श्री भगवान बाबा : पुण्यतिथीनिमित्त वालूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

सेलू जि.परभणी : राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वालूर येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (२७ जानेवारी) माणिक महाराज रेंगे यांच्या काल्याचे कीर्तनाने आणि महाप्रसादाने सांगता झाली. मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सप्ताहामध्ये नारायण बुवा पाठक यांनी भागवत कथा निरूपण केले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महेश महाराज देशमुख, प्रकाश महाराज फड, विजय महाराज वाघ बनकर, शिवतेजानंद महाराज दराडे, राधेश्याम महाराज खरबळ,विठ्ठल महाराज उमरीकर, जालिंदर महाराज दराडे यांचे कीर्तन, भारूड ,जागरणाचा कार्यक्रम झाला. पहाटे काकडा भजन, सायंकाळी हरिपाठ झाला. शनिवारी (२७ जानेवारी ) माणिक महाराज रेंगे यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले.
पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!