Get Together : तब्बल तीस वर्षांनी जमला वर्गमैत्रिणींचा मेळा

Get Together : तब्बल तीस वर्षांनी जमला वर्गमैत्रिणींचा मेळा

Get Together : तब्बल तीस वर्षांनी जमला वर्ग मैत्रिणींचा मेळा

सेलूतील नूतन कन्या शाळेला माजी विद्यार्थिनींची स्नेहभेट

सेलू जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागाच्या १९९३ च्या दहावीच्या बॅचमधील मैत्रीणींचा मेळा शाळेच्या प्रांगणात जमला. शालेय आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधला
संस्थेच्या बंदिस्त प्रेक्षागृहाला भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया यांनी स्वागत केले. माजी मुख्याध्यापिका शोभा चाटे, सुरेखा रामदासी शाम बारस्कर, के.पी.राठोड, प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल, संतोष पाटील यांची उपस्थिती होती. माजी विद्यार्थिनींनी शाळेतील आठवणी उजाळा देत संवाद साधला. आनंद व समाधान व्यक्त केले. संस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये आदिती कोठेकर, कल्याणी देशमुख, कल्याणी सुभेदार अनुराधा सोन्नेकर, मधुरा आनंदगावकर, सुप्रिया भरदम, सुषमा शिकारे कावेरी हुंबे, वैशाली परभणीकर, मनीषा जोशी, दिपाली जोशी, अंजली देशपांडे, वंदना तिळकरी आदींचा समावेश होता. डी.बी.घोगरे सर, डी.डी.सोन्नेकर, अशोक लिंबेकर, फुलसिंग गावीत, बेबीताई हेलसकर, कीर्ती राऊत, बालाजी देऊळगावकर, आकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!