Silver Medal : सात तलवारी फिरविणारी ‘दिव्या’ रजत पदकाची मानकरी; राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेतील कामगिरी

Silver Medal : सात तलवारी फिरविणारी ‘दिव्या’ रजत पदकाची मानकरी; राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेतील कामगिरी

सेलू : राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे पार पडलेल्या तलवारबाजी (गटका) स्पर्धेत सेलू  येथील दिव्या रामप्रसाद घोडके हीने दैदिप्यमान कामगिरी करत रजत पदक पटकावले आहे. दिव्या सेलू येथील नूतन कन्या प्रशालेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच तिला  तलवारबाजी, काठी, बॉक्सिंग आदी खेळांची आवड होती. वडील रामप्रसाद घोडके यांनी तिच्या कलागुणांना ओळखून प्रोत्साहन दिले. मास्टर पंकज सोनी, किशोर ढोके, पांडुरंग अंभुरे, नागेश कान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्याने विविध खेळांचे धडे घेतले. तिला तीस प्रकारच्या काठ्या व सात प्रकारच्या तलवारी फिरवता येतात. आत्तापर्यंत तिने सहा गोल्डमेडल, दोन सिलव्हर व एक कांस्यपदक प्राप्त केले आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डाॅ.विलास मोरे, भाजपा शहराध्यक्ष अशोक अंभुरे, गंगाधर कान्हेकर, प्रा.नागेश कान्हेकर, सतीश जाधव, बाळासाहेब काष्टे यांनी दिव्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!