वार्षिक स्नेहसंमेलन : सेलूतील न्यू हायस्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एकाहून एक सरस नृत्य, नाटिकांनी जिंकली श्रोत्यांची मने
सेलू जि.परभणी : छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी, २७ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. एकाहू एक सरस सामुदायिक नृत्यांना श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. समिती सदस्य संतोष कुलकर्णी प्रभारी प्राचार्य धनंजय भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘त्यात एकच राजा इथे जन्माला, ऐसा देश है मेरा, गाणं वाजू द्या, लेजा लेजा, मला जाऊ द्या ना घरी, गुलाबी शरारा, ढोलकीच्या तालावर, अशा अनेक गाण्यावर रसिकांनी ठेका धरला. म्यूजिकल ड्रामा, एकपात्री नाटकांनाही श्रोत्यांची दाद मिळाली. शेला पागोटे, आनंद नगरीला प्रतिसाद मिळाला. अशोक काकडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य धनंजय भागवत यांनी केले. सूत्रसंचालन जी.के.तोटेवाड यांनी केले. गाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शेषराव नागरे, रामेश्वर कदम, एम.आर.कुरेशी , प्राध्यापक भाऊसाहेब निकम, प्राध्यापक संतोष कुलकर्णी , प्राध्यापक आबासाहेब सावंत, मैनू बेग, दत्तात्रय सोळंके, एस.एन.पवार, ए.बी.रोंटेवाड, एस.आर.मोरे, डी.एस.गिरी, जे.जी. आव्हाड, सुनील मोरे, जोगदंड, प्रनयना तेलगोटे, मंजुषा बोराडे, विष्णू सरकटे, सी.यु.शिंदे, अजिंक्य बोराडे, अभिजीत कदम, गजमल, मोरे, काष्टी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांची मोठी उपस्थिती होती.