रोडगे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सेलूचा मॉडर्न सीसी संघ विजेता; केएमएस क्रिकेट क्लब उपविजेता

रोडगे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सेलूचा मॉडर्न सीसी संघ विजेता; केएमएस क्रिकेट क्लब उपविजेता

डॉ.संजय रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम, मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन विजेत्यांचा गौरव

डॉ.संजय रोडगे म्हणाले, ” सेलूतील क्रिकेट प्रेमींसाठी व खेळाडूंसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सेलू तालुका तसेच परिसरामधील खेड्यापाड्यातील खेळाडूंना या ठिकाणी उत्कृष्ट खेळ सादर करता आला. एक उत्तम खेळाडू कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण पाच दिवसीय स्पर्धेत पाहायला मिळाले.

रोडगे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सेलूचा मॉडर्न सीसी संघ विजेता; केएमएस क्रिकेट क्लब उपविजेता

सेलू जि.परभणी  : डॉ.संजय रोडगे मित्र मंडळ आयोजित रोडगे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धच्या अंतिम सामन्यात सेलूच्या मॉडर्न सीसी संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय संपादित करून रोडगे प्रीमियर लीग चषक पटकाविला. केएमएस क्रिकेट क्लब संघ उपविजेता ठरला आहे. विजेत्यांना सोमवारी रोख पारितोषिक व चषक देऊन गौैरविण्यात आले.
नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर आयोजित पोरितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक डॉ.संजय रोडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पटवारी, डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.अरविंद बोराडे, भास्करराव पडघन नागेश कान्हेकर, गणेश माळवे, अर्जुन बोरुळ, बिरू पोळ, माऊली पावडे,  विठ्ठल कोकर, अशोकराव रासे, गणेश काटकर, कपिल फुलारी, दीपक रोडगे, गणेश रोडगे,  कैलास ताठे, अन्वर पठाण, प्रकाश गजमल, दत्ताराव लाटे, बाबा गजमल, सुनील हिवाळे, कैलास रोडगे, दुर्गादास आळसे, शिवाजी सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम पुरस्कार मॉडर्न सीसी संघास डॉ.संजय रोडगे यांच्याकडून ४१ हजार रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात आले. व्दितीय पारितोषिक  केएमएस क्रिकेट संघास ३१ हजार व चषक देण्यात आले. मालिकावीरचा मानकरी मॉडर्न सीसी संघाचा मोईज बागवान ठरला. उत्कृष्ट फलंदाज अजय काष्टे. उत्कृष्ट गोलंदाज शुभम पवार यांना चषक देऊन गौरवण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.संजय रोडगे म्हणाले, ” सेलूतील क्रिकेट प्रेमींसाठी व खेळाडूंसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सेलू तालुका तसेच परिसरामधील खेड्यापाड्यातील खेळाडूंना या ठिकाणी उत्कृष्ट खेळ सादर करता आला. एक उत्तम खेळाडू कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण पाच दिवसीय स्पर्धेत पाहायला मिळाले. गुणलेखक सलमान सिद्दीकी, समालोचन शेख यासेर, म्याडी यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकिय अधिकारी प्रा.महादेव साबळे, कपिल ठाकूर, रवी रोडगे,  गणेश येवले, अशोक बोडखे,  राजू शेरे, दशरथ खुडे, महादेव दवंडे, विठ्ठलमामा यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!