चाचा नेहरु बालमहोत्सवाचे उद्घाटन; दीड हजारावर विद्यार्थ्यांचा सहभाग

चाचा नेहरु बालमहोत्सवाचे उद्घाटन; दीड हजारावर विद्यार्थ्यांचा सहभाग

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती, विविध कार्यक्रमांचे आयोजन

परभणी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत २९ ते ३१ जानेवारी दरम्यान होत असलेल्या बालमहोत्सवाचे उद्घाटन सोमवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.

या वेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी श्री.सामाले, अपर कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे, लेखाधिकारी श्रीमती शिंदे, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. कातनेश्वरकर, बाल न्याय मंडळाचे सदस्य श्रीमती नेरलीकर, श्री. पुराणिक, शासकीय बालगृह अधीक्षक गोविंद अंधारे, अनिल कांदे, जिल्हा सरंक्षण अधिकारी श्री. नागरे, परिविक्षा अधिकारी श्रीमती तांदळे, श्रीमती मनतकर, बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

हा बालमहोत्सव २९ ते ३१ जानेवारी दरम्यान सुरू राहणार असून २९ जानेवारी रोजी रनिंग, कबड्डी, दोरीवरच्या उड्या, लांब उडी, लिंबू चमचा या सारख्या ८ मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. य मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले आहेत. ३० जानेवारी रोजी बुद्धिबळ, कॅरम, वक्तृत्व, रांगोळी, यासारखे इनडोअर गेम, तर ३१ जानेवारी रोजी गीतगायन, नृत्य संस्कृतीक कार्यक्रम व समारोप होणार आहे. महोत्सवात जिल्ह्यातील जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले असल्याचे माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!