मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून  विद्यार्थ्यांनी आर्थिक नियोजन, बचतीचे महत्त्व, ऑनलाइन व्यवहार करतांना घ्यावयाची काळजी, बँकांचे व्यवहार समजून घेणे आवश्यक आहे, असे मत देवगिरी नागरी सहकारी बँकचे शाखा व्यवस्थापक विश्वास देव यांनी व्यक्त केले.

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालयामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये  “आर्थिक साक्षरता व बँकांचे व्यवहार” या विषयावर सेलू येथील देवगिरी नागरी सहकारी बँकचे शाखा व्यवस्थापक विश्वास देव यांचे व्याख्यान सोमवारी, २९ जानेवारी रोजी आयोजिण्यात आले होते. व्याख्यानातून श्री देव यांनी विद्यार्थ्यांना बचत,आर्थिक शिस्त आणि साक्षरतेचे धडे दिले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. मंचावर पर्यवेक्षक के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर उपस्थित होते. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून  विद्यार्थ्यांनी आर्थिक नियोजन, बचतीचे महत्त्व, ऑनलाइन व्यवहार करतांना घ्यावयाची काळजी, बँकांचे व्यवहार समजून घेणे आवश्यक आहे, असे श्री देव यांनी नमूद केले. प्रास्ताविक संतोष क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी पटाईत यांनी केले. सुनील तोडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कुशल कडे, अरविंद अंबेकर, अतुल पाटील, संतोष मलसटवाड, उमेश क्षीरसागर यांनी परिश्रम घेतेले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!