मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्यावतीने विविध उपक्रम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्यावतीने विविध उपक्रम

विविध  बँका, व्यावसायिकांना भेटी देत विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती.

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के.आर.आर प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियांतर्गत विविध बँकेला भेट, स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व, ओला कचरा व सुका कचरा व परस बाग आदी कार्यक्रम  शनिवारी, तीन फेब्रुवारी रोजी  घेण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक या बँकांना विद्यार्थ्यांनी भेट दिली. बँकेचे मॅनेजर व कर्मचारी यांनी बँकेतील व्यवहार ज्ञान व आर्थिक ज्ञान याची माहिती दिली. यामध्ये होम लोन, स्वतःसाठी लोन, चेक बाउन्स, धनादेश पडताळणे, धनादेशाची वैधता ( चेक व्हॅलिडीटी ), धाड पडणे ( रेड पडणे) इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. यातून वित्तीय सेवाची माहिती मुलांना कळाली.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : सेलूतील  रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्यावतीने विविध उपक्रम

विविध व्यावसायिकांना भेटी

‘स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व जाणून  घेण्यासाठी रवळगाव येथील रामकिशन लिंगायत यांच्या ‘कुंभार’ व्यवसायाची माहिती मुलांना मिळाली. त्यात त्यांनी फुलदाणी, कुंडा, गल्ला, उदानी इत्यादी मातीचे वस्तू मुलांना प्रात्यक्षिक बनवून दाखवले. दत्ता दिगंबर घडे ‘सुतार काम’ लाकडांच्या फर्निचर संदर्भात मुलांना माहिती दिली. फर्निचरच्या संदर्भात लागणाऱ्या अवजारांचे नावे व त्यांचा उपयोग मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले. यातून मुलांना स्वय: रोजगार शिक्षणाचे महत्त्व कळाले.
‘ओला कचरा व सुका कचरा ‘ या कार्यक्रमांमध्ये रवळगाव ग्रामपंचायत चे सरपंच दीपक आसाराम रोडगे, सदस्य संतोष भुजंगराव रोडगे व गोविंद रोडगे, प्रवीण रोडगे, अशोक रोडगे, रामेश्वर राऊत, विष्णू मिंड आदि मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या समोरच विद्यार्थ्यांनी ओला कचरा व सुखा कचरा याचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. लोकांना कचऱ्यांचे दुष्परिणाम त्याचा उपयोग कसा करावा याची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली. परस बाग उपकआमांत शाळेच्या पाठीमागेच परस बाग लावण्यात आलेली आहे. यामध्ये टमाटर, मेथी, पालक असा विविध पालेभाजा व इतरही फळभाज्या लावून मुलांना याचे ज्ञान देण्यात आले.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : सेलूतील  रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्यावतीने विविध उपक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!