श्रीराम मंदिराचा देखावा लक्षवेधी; सेलूतील सामुदायिक हळदी कुंकवाचे कार्यक्रम उत्साहात;
सेलू जि.परभणी : अयोध्येत नुकताच श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. या पार्श्वभूमीवर संक्रांती निमित्ताने ठिकठिकाणी आयोजित हळदी कुंकवाच्या सामुदायिक कार्यक्रमातही प्रभू श्रीरामाची गाणी, श्रीरामाची, मंदिर प्रतिमेची रांगोळी यासह विविध सामाजिक उपक्रम व आकर्षक देखाव्यांनी उत्साह भरला आहे. सेलू शहरात बोराडे परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रामायण, अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा अत्यंत आकर्षक देखावा मांडण्यात आला होता. देखावा पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. या प्रसंगी प्रसंगी विजया बोराडे, ऊर्मिला बोराडे, नयन बोराडे यांनी महिलांना हळदी-कुंकू लावून भेटवस्तू दिल्या. दरम्यान, यंदाच्या हळदी कुंकवाच्या सामुदायिक कार्यक्रमात विविध सामाजिक विषय, राष्ट्रीय एकात्मता, एक वेशभूषा, एक राज्य आदींचाही उत्साह विविध महिला मंडळांमध्ये दिसून येत आहे.