शिक्षिकेच्या निरोपप्रसंगी विद्यार्थी भावूक ; सेलूतील न्यू हायस्कूलच्या मंगल जोगदंड यांचा सेवागौरव

शिक्षिकेच्या निरोपप्रसंगी विद्यार्थी भावूक ; सेलूतील न्यू हायस्कूलच्या मंगल जोगदंड यांचा सेवागौरव

सेलू जि.परभणी : छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूलच्या जेष्ठ शिक्षिका मंगल अशोकराव जोगदंड यांचा सेवानिवृत्ती निमित्त बुधवारी, ३१ जानेवारी रोजी सेवागौरव करण्यात आला. लाडक्या शिक्षिकेच्या निरोपप्रसंगी विद्यार्थी भावूक झाल्याचे या प्रसंगी दिसून आले. या वेळी शालेय समिती अध्यक्ष अशोक काकडे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ.सविता रोडगे, डॉ.ऋतुराज साडेगावकर. या वेळी विद्यार्थीनी दुर्गा मगर, येलगुटे, प्राध्यापक रावते यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. जोगदंड यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.आभार डॉ.अभिलाषा जोगदंड यांनी मानले.प्राध्यापक नागेश कान्हेकर, सुनील गायकवाड, डी.व्ही.मुळे, संतोष शिंदे, मोहन बोराडे, लता गिल्डा, कांचन बाहेती डॉ.अनिकेत जोगदंड, डॉ.अनुराग जोगदंड, प्राचार्य बोराडे, धनंजय भागवत, शरद मगर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!