आयेशा पठाणचे रेखाकला परीक्षेत यश

आयेशा पठाणचे रेखाकला परीक्षेत यश

आयेशा पठाणचे रेखाकला परीक्षेत यश

सेलू जि.परभणी : शहरातील गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत’ इंटरमीजिएट ग्रेड परीक्षेत यश संपादन केले आहे. या परीक्षेत पठाण आयेशा उमीज माेबीनखान या विद्यार्थिनीने ‘ ए’ ग्रेड प्राप्त केला, तर पठाण झोया अझमत खान हिने बी ग्रेड प्राप्त केला. सय्यद हुरैन फातेमा शफिक, अल्फिया अन्सर, पठाण आदिना शकील खान, शेख झोया शोएब, पठाण अरीना फातेमा मोबीन खान यांनी सी ग्रेड प्राप्त केला आहे. शाळेचा निकाल ८७.१३ टक्के लागला आहे. कला शिक्षिका अन्सारी फहेमीदा व  शिक्षक सय्यद सिजर ,सिद्दिकी फजल, मोहम्मद जहीर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष पठाण रहीम खान खैरुल्लाखान मुख्याध्यापिका कासमी तहेसीन यांनी चित्रकला परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!