कुंभारीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला खिंडार
सेलू,जि.परभणी : जिंतूर सेलू तालुक्याच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर आणि भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुंभारी येथील माजी सरपंच भगवानराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू बचाटे, पंडितराव शिंदे, गणेश शिंदे, किशोर शिंदे, नानासाहेब चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय विचारधारा आणि दोन वर्षातील राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जो विकास कामांचा झंजावात जिंतूर,सेलू तालुक्यात सुरू केला आहे. तसेच प्रत्येक गावातील समस्या मार्गी लावून विकास कामांसाठी पुढाकार घेत प्रत्येक गावी भरघोस निधी उपलब्ध करून दिला व गावागावातील लोकांच्या अडचणी दूर केल्या याला प्रेरित होऊन बहुसंख खेड्यातील विविध पक्षांच्या पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दत्ता कदम, जिल्हा उपाध्यक्ष माऊली ताठे, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, गणेश काटकर, पांडुरंग सोळंके,केदारेश्वरराव मोगल, अच्युत कवडे आदींची उपस्थित होती.