…अखेर विनोद बोराडे यांनी बांधले घड्याळ; अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी’ मध्ये प्रवेश
सेलू जि.परभणी : सेलू्चे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रवेश केला. राष्ट्रवादी भवनात दुपारी साडेचार वाजता आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोराडे यांच्यासह समर्थकांचे स्वागत केले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोराडे यांच्या सोबत माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, रमेश दौड, सचीन कोरडे, सतीश जाधव, गौतम धापसे, वहिद अन्सारी, बालू झमकडे, शेख कासीम, शेख आयुबभाई, बबन गायकवाड, शेख अन्वर, व्यंकट चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, राजेंद्र झोडगावकर, बालासाहेब सरकाळे, शेख रौफ नासर पठाण आदींसह अनेकांची उपस्थिती होती.