सेलूतील लक्ष्मीप्रसाद पटवारी यांना देवर्षी नारद युवा कीर्तनकार पुरस्कार
पुणे येथील श्रीहरीकीर्तनोत्तेजक सभा यांच्या वतीने सन्मान
सेलू : येथील योगेश महाराज साळेगावकर संचालित, स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तन कुलातील पहिला विद्यार्थी लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी यांना पुणे येथील श्री हरीकिर्तनोत्तेजक सभा नारदमंदिर यांच्यावतीने देवर्षी नारद युवा कीर्तनकार पुरस्काराने देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
लक्ष्मीप्रसाद पटवारी इयत्ता सहावीत असताना वयाच्या ११ व्या वर्षी गुरुकुलात आला आहे. गुरुकुलचे संचालक योगेश महाराज साळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासी कीर्तन सेवेत मोठी झेप घेतली आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आदी राज्यांत २०० हून अधिक ठिकाणी कीर्तन सेवा केली असून, झीटीव्ही, गजर कीर्तनाचा यावरही कीर्तन सेवा केली आहे. तसेच तू माझा सांगाती या जगद्गुरु श्रीसंततुकाराम महाराजांच्या मालिकेतश्री संत एकनाथांचे सेवक श्रीखंडया यांची भूमिका देखील केली आहे. दरम्यान, स्वामी गोविंददेवगिरीजी गुरुकुल यांच्या कडून करवीरपीठाचे शंकराचार्य परमपूज्य विद्यानरसिंहस्वामी यांच्या हस्ते बालकीर्तनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या यशस्वी पदार्पणाची नोंद पुणे येथील मागील अनेक वर्ष हरिदासी कीर्तनाची उपासना करणारी संस्था श्री हरिकीर्तनोत्तेज सभा नारद मंदिर यांनी नोंद घेतली. अतिशय मानाचा समजला जाणारा देवर्षी नारद युवा कीर्तनकार पुरस्काराने लक्ष्मीप्रसाद पटवारी यांना सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी, ४ फेब्रुवारी रोजी पुणे येथील नारदमंदिर येथे एका विशेष समारंभात कीर्तन कलानिधी रामचंद्रबुवाभिडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल बालकिर्तनरत्न लक्ष्मीप्रसाद पटवारी यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. राममंदिर समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी, चैतन्य महाराज देगलूरकर यांनी लक्ष्मीप्रसाद यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.