नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बॅंकेला भेट; व्यवहाराची जाणून घेतली माहिती.

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बॅंकेला भेट; व्यवहाराची जाणून घेतली माहिती.

सेलू : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मंगळवारी, सहा फेब्रुवारी रोजी नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शहरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेला भेट देऊन बँकांचे व्यवहार कसे केले जातात, हे समजून घेतले. बँकेचे शाखा व्यवस्थापक विश्वास देव यांनी विद्यार्थ्यांना बँकांच्या सर्व व्यवहारासंदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या बँकांच्या योजनांची माहिती दिली. या उपक्रमासाठी एस.एन.क्षीरसागर, ए.ए.पाटील, यु.डी.क्षीरसागर, के.एस.कडे, एस.आर.तोडकर,‌ ए.पी.पटाईत यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!