सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे; मेडमार्ट अँड सुपर मार्केटला दिली भेट

सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे; मेडमार्ट अँड सुपर मार्केटला दिली भेट

चिकाटी,परिश्रम व नियोजनाला तत्पर सेवा,आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कोणत्याही व्यवसायात यशस्वी होता येते. भविष्यातील व्यावसायिक संधी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा मूलभूत पाया पक्का करावा तसेच भविष्यवेधी व्यावसायिक शिक्षण घ्यावे – संदीप टाक, संचालक, मेडमार्ट फार्मसी अँड सुपर मार्केट

सेलू जि.परभणी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत येथील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी मेडमार्ट फार्मसी अँड सुपर मार्केटला भेट दिली. मेडमार्टचे संचालक संदीप टाक, समीर नाईकवाडे व कैलास काळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संचालक संदीप टाक यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. चिकाटी,परिश्रम व नियोजनाला तत्पर सेवा,आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कोणत्याही व्यवसायात यशस्वी होता येते. भविष्यातील व्यावसायिक संधी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा मूलभूत पाया पक्का करावा तसेच भविष्यवेधी व्यावसायिक शिक्षण घ्यावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला टाक यांनी विद्यार्थ्यांना दिला. मेडमार्टच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. नूतन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक संतोष क्षीरसागर, सुनील तोडकर, उमेश क्षीरसागर, अश्विनी पटाईत, अदिती अंबेकर यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!