भांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’; जिंतूर तहसीलवर धडकला मोर्चा
या वेळी झालेल्या सभेमध्ये माजी आमदार विजय भांबळे यांनी विद्यमान आमदारांच्या कार्यशैलीवर टिका केले. भांबळे म्हणाले, विद्यमान आमदारांना मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवाचून काही देणं घेणं नाही. त्या फेसबुक वर बिझी असतात. मी आमदार असताना व युपीएचे सरकार असतांनादेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परभणी येथे पायी मोर्चा काढला होता, अशी आठवण भांबळे यांनी करून दिली. तसेच मागे विद्यमान आमदार यांनी केलेल्या आरोपावर उत्तर म्हणून, त्यांनी केलेल्या ३३ केव्हीमध्ये , जिंतूर शहरात २, दुधगाव, मालेगाव, कोठा, हादगाव पावडे, पाचलेगाव, ढेंगळी पिंपळगाव तसेच पीएससी दवाखाने, आसेगाव, चारठाणा, चिकलठाणा, पाचलेगाव, कोठा, कौसडी, वालूर व उपकेंद्र – मोरेगाव, वाघी (धा) यानंतर माध्यमिक शाळा चारठाणा, बोरी, दुधगाव, कौसडी यांचा पाढा वाचून दाखवला, तर तुम्ही काय विकास केला, असा प्रश्न देखील भांबळे यांनी विचारला.
परभणी : जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने पाठ फिरवल्यामुळे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, ६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय येथून जिंतूर तहसील कार्यालयावर “शेतकरी आक्रोश मोर्चा” काढण्यात आला.
या वेळी विजयराव भांबळे यांनी शेतकरी यांना संबोधित करतांना जिंतूर व सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्या मुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही. झालेल्या शेतीपिकाची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तसेच पिक विमा देखील मंजूर करण्यात आलेला नाही. सध्या जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ पाहता पाणी टंचाई, चारा छावण्या, पुरेसी वीज ई. नियोजन करणे गरजेचे आहे
शासनाची शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत उदासीन भूमिका दिसून येते. जिंतूर व सेलू तालुक्यात भीषण दुष्काळ असताना देखील शासनाने सौम्य दुष्काळ जाहीर केलेला आहे. दुष्काळाची परिस्थिती तरी सौम्य दुष्काळ नसून तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात यावा व तीव्र दुष्काळाच्या सर्व आर्थिक मदती व दुष्काळ काळातील सर्व कामे युद्ध पातळीवर सुरु करण्यात यावे. सद्य परिस्थितीत चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पन्नाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या करिता शासनाने सोयाबीनला ८,०००/- रु व कापूस पिकास १२,०००/- रु दराने खरेदी करण्यासाठी आदेश काढावे किंवा शासकीय खरेदीकेंद्र चालू करण्यात यावेत. सन २०२१-२२ च्या ऑगष्ट महिन्यामधील सततच्या पावसाने नुकसान झाल्यामुळे शासनाकडून १३,६००/- रु एवढी प्रति हे. अशी मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु, जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे त्यामुळे उर्वरित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. मागील वर्षीचा व यावर्षीचा सन २०२३ – २४ चा पिक विमा शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही तो तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावा. जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीकडे पिक विम्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या त्या कंपनीने ८० ℅ रद्द केले आहेत व त्यापैकी फक्त २० ℅ तक्रारी मंजूर केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या सर्व १००% प्राप्त तक्रारी मंजूर करून त्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा व वाटप करण्यात यावा. जिंतूर तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, फळबाग ई. पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकरी आडचणीत आलेला आहे. त्यामुळे जिंतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व तसेच पिक विमा कंपनीने पंचनामे करून रक्कम अदा करण्यासाठी आदेशित करण्यात यावे तसेच शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. चालू वर्षात पीकविमा कंपनीने अजून शेतकऱ्यांना काहीच मदत केलेली नाही. यामध्ये शेतकऱ्यांना १००% आग्रीम मंजूर करण्यात यावा. महाराष्ट्रात तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर व सेलू तालुक्यात शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी देण्यात यावी. सन २०१८ मध्ये काही मंडळात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली होती. ती आज पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही ती तात्काळ अदा करण्यात यावी. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांची तसेच जनावरांची पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून चारा छावणी व विहीर, बोअर अधिग्रहण व नवीन बोअर घेण्यासाठी आजपासून त्याचे नियोजन करण्यात यावे. जिंतूर व सेलू तालुक्यातील सर्वच ३३ के.व्ही. सबस्टेशन ओव्हरलोड झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व ३३ के.व्ही. सब स्टेशनसाठी नवीन ५ चे ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावे. जिंतूर व सेलू तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गावठाणचे डी.पी. ओव्हरलोड झाल्यामुळे ज्या ठिकाणी ६३ के.व्ही. चे डी.पी.आहेत त्या ठिकाणी १०० के.व्ही.चे डी.पी.बसवण्यात यावेत. तसेच काही भागात सिंगल फेस चे ट्रान्सफार्मर बसवलेले आहेत त्या ठिकाणी थ्री फेसचे १०० चे ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावेत. जिंतूर व सेलू तालुक्यात शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा व शेतकऱ्यांचे दुष्काळ परिस्थितीमुळे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे. मागील दोन वर्षापासून जिंतूर व सेलू तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीची कामे केलेली असून त्यांची कुशलची बिले अजून अदा करण्यात आलेली नाहीत ती तात्काळ अदा करण्यासाठी संबंधीतास आदेशित करण्यात यावे या प्रश्नावर लक्ष वेधले तसेच विद्यमान आमदार यांना मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावाचून काही देणं घेणं नाही, त्या फेसबुक वर बिझी असल्याचा टोला लगावला. मी आमदार असताना व युपीएचे सरकार असतानादेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परभणी येथे पायी मोर्चा काढला होता, अशी आठवण करून दिली. तसेच मागे विद्यमान आमदार यांनी केलेल्या आरोपावर उत्तर म्हणून त्यांनी केलेल्या ३३ केव्हीमध्ये , जिंतूर शहरात २ दुधगाव, मालेगाव, कोठा, हादगाव पावडे, पाचलेगाव, ढेंगळी पिंपळगाव तसेच पीएससी दवाखाने, आसेगाव, चारठाणा, चिकलठाणा, पाचलेगाव, कोठा, कौसडी, वालूर व उपकेंद्र – मोरेगाव, वाघी (धा) यानंतर माध्यमिक शाळा चारठाणा, बोरी, दुधगाव, कौसडी यांचा पाढा वाचून दाखवला, तर तुम्ही काय विकास केला असा प्रश्न देखील विचारला. या वेळी अशोक काकडे, प्रेक्षा भांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रसादराव बुधवंत, अजयभैया चौधरी, विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, अशोकनाना काकडे, बाळासाहेब रोडगे, राजेंद्रकाका लहाने, विठ्ठलराव घोगरे, गणेशराव इलग, शरद मस्के, मनोजभाऊ थिटे, सुधाकर रोकडे, मनीषाताई केंद्रे, आशाताई खिल्लारे,शरदराव अंभूरे, शरदराव मस्के, प्रकाशराव शेवाळे, मुंजाभाऊ तळेकर, मधुकर भवाळे, विजय खिस्ते, दत्तराव काळे, मनोहर डोईफोडे, अहेमद बागबान, दलमीर पठाण,सोहेल सर, शोएब जानिमिया,चंद्रकांत बहिरट, उस्मान पठाण, इस्माईल शेख, बंटीभाऊ निकाळजे, सलीम काझी, अकबर कुरेशी, हकीम लाला, बालाजी नव्हाट, बालाजी सांगळे, अभिजित भांबळे, सचिन राठोड, पिंटू मस्के, तूपसुंदर, शंकर जाधव, राहुल घुले, प्रवीण चव्हाण, शौकत लाला, अक्कू लाला, खय्युम कादरी,अविनाश मस्के, इत्यादींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.