Elementary & Intermediate Grade : रेखाकला परीक्षेत सेलूतील ३५ विद्यार्थ्यांचे यश

Elementary & Intermediate Grade : रेखाकला परीक्षेत सेलूतील ३५ विद्यार्थ्यांचे यश

Elementary & Intermediate Grade : रेखाकला परीक्षेत सेलूतील ३५ विद्यार्थ्यांचे यश

सेलू जि.परभणी : राज्य सरकारच्या कला संचालनालयाच्या वतीने आयोजित एलिमेंटरी व एंटरमिजिएट रेखाकला ग्रेड परीक्षेत सेलूतील विविध शाळांतील ३५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ‘अ’ श्रेणीत तेरा तर ‘ब’ श्रेणीत बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नूतन विद्यालयाच्या परिमल सोलापुरे, प्रांजल मुळे, पलश भुक्तर यांनी ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे.‌ ‘ब’ श्रेणीत यश लिपने, प्रथमेश‌‌ मानवतकर, सुमेध कापसे , सिद्धांत नागरे, प्रगती मगर, पंडित तृप्ती, प्रथमेश मोटे यांचा समावेश आहे. शाळेचा निकाल ८७ टक्के आहे. चित्रकला विभाग प्रमुख आर.डी.कटारे, कलाशिक्षक फुलसिंग गावीत यांचे मार्गदर्शन लाभले. लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या स्नेहा मुनेश्वर, अनुजा शेडुते, ऋतुजा रोडगे, पल्लवी सातपुते, पल्लवी काकडे, चैताली काकडे, मान्यता तावरे, जागृती ताठे या विद्यार्थिनींनी ‘अ’ श्रेणी प्राप्त केली, तर श्रेया राऊत, वेदिका बोराडे, स्नेहल कांबळे, समृद्धी मुळी, दिव्या ढवळे, भक्ती काकडे, ऋतुजा घोंगडे, अक्षरा वायाळ या विद्यार्थिनीं ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. गजानन मजगे, कीर्ती राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित‌ न्यू हायस्कूलचा निकाल शंभर टक्के आहे.‌ अश्विनी रनखांबे, मयूरी हजारे यांनी ‘ब’ श्रेणीत यश संपादन केले आहे. कला शिक्षक सुनील मोरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या तेजस मुजमुले, सुमेधा ताजणे यांनी ‘अ’ श्रेणी, तर अस्मिता वैष्णव, पूर्वा सोळंके, विराज कोल्हे, सुमीत नीलवर्ण यांनी ‘ब’ श्रेणीत यश संपादन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!