It’s Confirmed : ‘अजितदादां’सोबतच : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे; बुधवारी मुंबईत समर्थकांसह प्रवेश करणार

It’s Confirmed : ‘अजितदादां’सोबतच : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे; बुधवारी मुंबईत समर्थकांसह प्रवेश करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील नेत्यांशी सुसंवाद झाला आहे. मुंबई येथे बुधवारी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थकांसह प्रवेश करणार आहे.विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष, सेलू

सेलू जि.परभणी : गेल्या २७ वर्षांपासून कॉंग्रेस, अपक्ष, भारतीय जनता पक्ष पुन्हा अपक्ष असा प्रवास करून सेलू नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रवेश करणार आहेत. दस्तुरखुद्द बोराडे यांनीच मंगळवारी, सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता भ्रमणध्वनीवरून बोलतांना ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून बोराडे अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मंगळवारी प्रवेशाच्या दृष्टीने हालचाली वेगात सुरू झाल्या. याबाबत विनोद बोराडे म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील नेत्यांशी सुसंवाद झाला आहे. मुंबई येथे बुधवारी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थकांसह प्रवेश करणार आहे, असे बोराडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादीतील एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, सेलू तालुका याला अपवाद ठरला. अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू माजी आमदार विजय भांबळे यांनी शरदचंद्र पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सेलू, जिंतूर तालुक्यात अजित पवार गटाची ताकद दिसून येत नव्हती. बोराडे यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठे बळ मिळणार आहे. शिवाय सेलू शहरातील विविध रखडेलेल्या विकास कामांसाठी नगरपालिकेला मोठा विकास निधी खेचून आणता येईल. तसेच आगामी काळात राजकीय ताकद वाढविण्यासाठी अजित पवार यांची खंबीर साथ मिळू शकते, यासाठी बोराडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!