सेलूतील ‘कोहिनूर रोप्स’चा राज्य उत्कृष्ट निर्यात पुरस्काराने सन्मान; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुणे येथे वितरण

सेलूतील ‘कोहिनूर रोप्स’चा राज्य उत्कृष्ट निर्यात पुरस्काराने सन्मान; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुणे येथे वितरण

उद्योजक नंदकिशोर बाहेती व चेतन बाहेती यांनी स्वीकारला पुरस्कार

दर्जेदार उत्पादन करून निर्यात क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल कोहिनूर रोप्सला ‘महाराष्ट्र स्टेट एक्सपोर्ट अवार्ड’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलग तीन वर्षांसाठी कोहिनूर रोप्सला हा बहुमान मिळाला ही सेलूसह परभणी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. लौकिकात भर पडली आहे. याबद्दल विविध स्तरांतून उद्योजक नंदकिशोर बाहेती यांचे अभिनंदन होत आहे.

सेलू जि.परभणी : सेलू येथील प्रसिद्ध कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादक कंपनीला वर्ष २०१८ ते २०२१ असा सलग तीन वर्षे राज्य सरकारच्या उद्योग संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्र स्टेट एक्सपोर्ट अवार्ड’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या सुवर्ण पुरस्काराने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुणे येथे गुरुवारी (८ फेब्रुवारी) गौरविण्यात आले. कोहिनूर रोप्सचे कार्यकारी संचालक तथा उद्योजक नंदकिशोर बाहेती व चेतन बाहेती यांनी पुरस्कार स्वीकारला. प्लास्टिक उत्पादन सेक्टरमधील सुवर्ण सन्मान प्रमाणपत्र तसेच रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथील हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल येथे उद्योग विभागाच्या वतीने राज्य निर्यात पुरस्कार आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभ आयोजिण्यात आला होता. याप्रसंगी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन शर्मा, विकास व निर्यात आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह आदींसह मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी दर्जेदार उत्पादन करून निर्यात क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल या कोहिनूर रोप्सला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराबद्दल बाहेती यांचे सेलू इंडस्ट्रियल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामेश्वर राठी, उपाध्यक्ष नीलेश बिनायके, श्याम काबरा, अविनाश बिहाणी, महेश बाहेती, संचालक भुपेंद्रसिंग राजपाल, जयप्रकाश बिहाणी, रामनाना खराबे, विजयकुमार बिहाणी, राजेंद्र तोष्णीवाल, ललीत बिनायके, ब्रिजगोपाल काबरा, प्रभुदयाल मंत्री, महेश खारकर, विपिन मंत्री, अभिषेक तायल, विजय पवार आदींंसह सामाजिक, शैक्षणिक औद्योगिक, व्यापार उद्योगासह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे..

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!