खैरीची झेडपी शाळा भरली दप्तराविना; कागद काम, सुतळी काम आदी उपक्रम

खैरीची झेडपी शाळा भरली दप्तराविना; कागद काम, सुतळी काम आदी उपक्रम

परभणी : येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा. या उद्देशाने दप्तराविना शाळा उपक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.

या वेळी मुख्याध्यापक बालासाहेब खवणे सहायक शिक्षक लखन उगीले, प्रेमा मंदाडे, ज्येष्ठ नागरिक बन्सी गोरे, कार्यशाळेचे मार्गदर्शक कला शिक्षक पांडुरंग पाटणकर उपस्थित होते.

पाटणकर यांनी कागदकाम ललित कला विषयी माहिती, टाळ्यांचे प्रकार, विविध माध्यम प्रिंट, वारली चित्रकला, कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात शेकोटी कार्यक्रमावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन सुत्रसंचलन लखन उगिले यांनी केले आभार प्रेमा मंदाडे यांनी मानले कार्यक्रमासाठी अंगणवाडी मदतनीस आघावताई यांनी तसेच एचएआरसी संस्थेचे डॉ.पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!