देऊळगावगातच्या शाळेमध्ये बाहुलीकाम कार्यशाळा; एचएआरसी संस्थेचा उपक्रम

देऊळगावगातच्या शाळेमध्ये बाहुलीकाम कार्यशाळा; एचएआरसी संस्थेचा उपक्रम

परभणी : येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा.या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन शुक्रवाररोजी करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक अंशीराम ढगे , जेष्ठ शिक्षक अशोक तळोकार, प्रभाकर शिंदे, जगदीश लहाने, कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन अंशीराम ढगे यांनी केले. कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी सकाळ सत्रात मुखवटा बाहुली, बोट बाहुली , शाडो पपेट आदी बाहुलीकाम शिकवले . या बरोबरच कागदकाम ललित कला विषयी माहिती , टाळ्यांचे प्रकार विविध माध्यम प्रिंट ,टाळ्यांचे प्रकार ,कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन केले.

द्वितीय सत्रात शेकोटी कार्यक्रमा वेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. यावेळी २०० विद्यार्थी सहभागी होते. सूत्रसंचालन अनिता मुगुटकर यांनी केले तर आभार प्रभाकर शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रज्ञा नवघरे, संध्या जाधव यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!