जिंतूरमध्ये चार कोटी ८० लाखांच्या विकासकामांना सुरुवात; आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन
परभणी : नगर विकास विभागामार्फत जिंतूर शहरातील रस्ते आणि नाली आदी ४ कोटी ८० लाख रुपयांच्या विविध प्रभागामधील विकासकामांचे भूमिपूजन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी झाले.
या प्रसंगी बोलताना आमदार बोर्डीकर यांनी सांगितले की, शहरवासीयांची गरज लक्षात घेता प्रत्येक प्रभागनिहाय कामे मंजूर करण्यात आली असून यापुढे देखील कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. या वेळी विकी बोर्डीकर, महेश चैतन्य महाराज, तालुकाध्यक्ष विनोद राठोड, डॉ.पंडित दराडे, सुनील भोंबे, गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, विलास भंडारे, किशोर जाधव, सुनील मते, संदीप आघाव, संजय कोकडवार, प्रदीप कोकडवार, राजू देवकर, गणेश कुरे, सचिन चिद्रवार, डॉ.भुतडा, नितीन कोकडवार, विजय अर्थमवार, गजू चिद्रवार, डॉ.विजय पहुणे, कैलास आदमाने, सानप, चक्रवार, बालाजी भराडे, कैलास खंदारे, फिरोज भाई, सुमेध सूर्यवंशी, रमेश गुजर, अलका मते, स्वाती मोरे, बाळाबाई पहुणे, सुरेखा राठोड, सरस्वती घुगे, गयाबाई आंबटवार, सुमन बार्शीकर, सुनिता पाचलेगावकर, देशमुख, कुलकर्णी, उकंडे, पानगे, घुगे, दराडे, इतकरे, आदींची उपस्थिती होती.
तुलसी कलेक्शन ते आदमाने मामा यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम ३० लक्ष, डॉ.दराडे ते गंगाधर तरटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम १५ लक्ष, एअरटेल टॉवर ते उकंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम १५ लक्ष, उकंडे यांचे घर ते तळणीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम २० लक्ष आदी कामांचा समावेश आहे.