राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल, फ्लोअर बॉल स्पर्धेचे सेलूत उद्घाटन

राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल, फ्लोअर बॉल स्पर्धेचे सेलूत उद्घाटन

टेनिस व्हॉलीबॉल, फ्लोअर बॉल खेळांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनोद बोराडे यांची ग्वाही

टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल खेळ मागे नाही. परंतु , या खेळाला महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांच्यामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून, राजाश्रय, समाज आश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले.

परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस आयोजित शालेय राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (१० फेब्रुवारी) उत्साहात झाले 

उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे उपस्थित होते .क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालयाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सत्यनारायण लोया होते. याप्रसंगी टेनिस हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, रवींद्र चौथवे, प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, संदीप लहाने, दत्तराव पावडे, प्रभाकर सुरवसे, मिलिंद सावंत, रामेश्वर कोरडे, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. या वेळी ६५० खेळाडूंनी मार्च पास करून मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित‌करण्यात आली. योगासनपटुंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी वयोगटातील १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुला-मुलींचे ७२ संघातील ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील, सूत्रसंचालन गोपाल आम्ले, तर प्रशांत नाईक यांनी आभार मानले. राज्य सचिव गणेश माळवे, पर्यवेक्षक डी.डी सोन्नेकर, के.के देशपांडे आदींसह शिक्षक, खेळाडूंची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!