विद्यार्थीदशेपासूनच निरोगी राहणे आवश्यक :;डॉ.सुनील कुलकर्णी
सेलू जि.परभणी : “पोषक आहार, व्यायाम ,आदर्श जीवनशैलीचा अवलंब करून निरोगी हृदय राहण्यासाठी ,लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे “, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉ.सुनील कुलकर्णी यांनी केले.
नूतन कन्या प्रशालेत माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. सुनील कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारणी सदस्य मकरंद दिग्रसकर, प्रमुख अतिथी हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुनील कुलकर्णी, प्रशालाचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री भालचंद्र गांजापुरकर, सुहास देऊळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती .
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. हृदयरोग तज्ञ डॉ. सुनील कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना हृदयाच्या निरोगी असण्यासाठी व्यायाम, योग्य पोषक आहार, आदर्श जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी बालवयापासूनच आपले हृदय निरोगी राखण्यासाठी काळजी घ्यायला हवी, असेही सांगितले. सूत्रसंचालन वैशाली चव्हाण यांनी तर आभार भालचंद्र गांजापुरकर यांनी मानले.