आरक्षणासाठी मराठा तरुणाची गळफास लावून आत्महत्या; सेलू तालुक्यातील राजवाडी येथील घटना 

 

आरक्षणासाठी मराठा तरुणाची गळफास लावून आत्महत्या; सेलू तालुक्यातील राजवाडी येथील घटना 

परभणी : आरक्षणासाठी सेलू (जि.परभणी) तालुक्यातील राजवाडी येथील प्रताप दिनकर शेवाळे ( वय २७) या मराठा तरुणाने शेतात पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

”माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सगेसोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन तो कायदा पारित करत नाही. या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे. एक मराठा लाख मराठा “. अशी प्रतापने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे.

या बाबत माहिती अशी की, प्रताप शेवाळे शनिवारी सकाळी शेतातून दुध घेऊन घरी आला. पुन्हा परत शेतात गेला. राजवाडी- सेलू रस्त्यावरील शेतात पळसाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून त्याने आपले जीवन संपविले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे, जमादार शिवदास सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली. सेलू उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत प्रतापच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सात वर्षांची मुलगी, सहा वर्षांचा मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वचिष्ट शेवाळे यांनी दिलेल्या खबरेवरून सेलू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. जमादार शिवदास सूर्यवंशी करीत आहेत.

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!