सेलूतील यशवंत विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात; आत्माराम कुटे यांच्या कवितांना विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

सेलूतील यशवंत विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात; आत्माराम कुटे यांच्या कवितांना विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण 

सेल जि.परभणी : सेलू येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशवंत प्राथमिक व यशवंत विद्यालयाचे स्नेहसंमेलन शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी उत्साहात झाले. या वेळी प्रमुख प्रसिद्ध ग्रामीण कवी आत्माराम कुटे यांनी सादर केलेल्या कवितांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी वार्षिक स्नेहसंमेलनातील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.‌ अध्यक्षस्थानी‌ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश बोराडे होते. कथाकार एस.पी.झुटे, मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, रतन थटवले यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

सेलूतील यशवंत विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात; आत्माराम कुटे यांच्या कवितांना विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

कवी कुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वतःच्या कविता विद्यार्थ्यांना हावभाव युक्त चालीवर म्हणून दाखवल्या. कवितेला विद्यार्थ्यांनी हसून व टाळ्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, रतन थटवले, छाया कोतवाल, सविता कुलकर्णी, शशीकांत सराफ, अनुराधा कानडे, विष्णू वामन, कैलास राऊत, भाऊराव सूर्यवंशी, अमर बोराडे, काशिनाथ काळे, महादेव सांगुळे, जयश्री चपाटे, आश्विनकुमार केदासे, संतोष खुडे, सिध्देश्वर मुरकुटे, कैलास खरड, गंगाधर पाचपुते, दीपक गजभारे, धनश्री देशमुख -रेवलकर, बालासाहेब मगर, कविता सिसोदे, स्वप्निल ब्रह्मराक्षे आदींंसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, पालकांची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!