बेभान होऊन स्वप्नांचा पाठलाग करा : कवी गणेश घुले; नूतन कन्या प्रशालेच्या बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप                       

बेभान होऊन स्वप्नांचा पाठलाग करा : कवी गणेश घुले; नूतन कन्या प्रशालेच्या बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप                       

सेलू जि.परभणी : “संकट, अडचणी आपले जीवन समृद्ध करण्यासाठी येतात. त्यामुळे संकटांना न घाबरता बेभान होऊन स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे. यश तुमच्या पुढे लोटांगण घेइल, असे मत प्रसिद्ध कवी गणेश घुले यांनी केले. येथील तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या प्रशाला उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांनाच्या शुभेच्छा समारंभप्रसंगी प्रमुख म्हणून ते बोलत होते. प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल, महेश अचिंतलवार, भालचंद्र गांजापुरकर, संगीता खराबे, डॉ.यशवंत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचा परिचय सपना पाटणी यांनी दिला. ‘परीक्षेला जाता जाता’ या विषयावर भालचंद्र गांजापुरकर आणि डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. महेश अचिंतलवार यांनी कवितेद्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आर.एन.कदम यांनी केले. विजय धापसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा आगळे, कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण, दगडू , बाबासाहेब थोरे यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!