पुणे, छत्रपती संभाजीनगरचे वर्चस्व; राज्य शालेय फ्लोअरबॉल, टेनिस हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात

पुणे, छत्रपती संभाजीनगरचे वर्चस्व; राज्य शालेय फ्लोअरबॉल, टेनिस हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात

पुणे, छत्रपती संभाजीनगरचे वर्चस्व; राज्य शालेय फ्लोअरबॉल, टेनिस हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर १० व ११ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल व टेनिस हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील संघांचे वर्चस्व राहिले. राज्यभरातील १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या संघातील ६५० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व नूतन विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बक्षीस वितरणप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, टेनिस हॉलीबॉल संस्थापक अध्यक्ष डॉ‌. व्यंकटेश वांगवांड, फ्लोअरबॉल राज्य सचिव रवींद्र चोथवे, टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, रामेश्वर कोरडे अशोक शिंदे, संतोष पाटील , प्रफुल्ल बनसोड, दीपक वडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, राहुल वाघमारे, तर प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले.

टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा स्पर्धेचा अंतिम निकाल  : १४ वर्षे मुले प्रथम : मुंबई – चंद्रेश लोढा, मेमोरिअल खुल, डोंबिवली, द्वितीय: छत्रपती संभाजी नगर – नूतन विद्यालय, सेलू, तृतीय: अमरावती – स्कूल ऑफ बिलीयन्ट्स, राळेगाव (यवतमाळ)
१४ वर्षे मुली : प्रथम : छत्रपती संभाजीनगर – जि.प.माध्य कन्या शाळा माजलगाव, व्दितीय: कोल्हापूर – राणी सरस्वती देवी कन्या शाळा सांगली तृतीय: मुंबई – श्री व्ही.एस. गुरुकुल टेक्निकल हायस्कुल, घाटकोपर. १७ वर्षे मुले : प्रथम : छत्रपती संभाजी नगर – नूतन विद्यालय, सेलू.
द्वितीय – अमरावती : स्कूल ऑफ बिलीयन्ट्स, राळेगाव (यवतमाबळ), तृतीय: मुंबई – श्री .व्ही.एस गुरुकुल, टेक्निकल हायस्कुल, घाटकोपर, मुली १७ वर्षे : प्रथम: कोल्हापूर – राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सांगली., द्वितीय : छत्रपती संभाजीनगर – नूतन विद्यालय सेलू,
तृतीय: अमरावती – स्कुल ऑफ स्कॉलर अकोला. मुले १९वर्ष – प्रथम : नाशिक – माध्यमिक विद्यामंदिर, एकलहरे जि.नाशिक द्वितीय: कोल्हापूर – लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्यू. कॉलेज, पलूस जि.सांगली तृतीय : मुंबई – चंद्रेश लोढा मेमोरियल हायस्कुल, डोंबिवली.
मुली १९ वर्षे- प्रथम :  कोल्हापूर – सी.बी. शाहा महिला महाविद्यालय, सांगली, द्वितीय: छञपती संभाजी नगर – नूतन महाविद्यालय, सेलू,
तृतीय: मुंबई – चंद्रेश लोढा मेमोरियल हायस्कुल, डोंबिवली.
राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा निकाल:  १९ वर्षं मुले- प्रथम : पुणे विभाग, ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर,  व्दितीय:- नाशिक विभाग श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ स्कूल नंदुरबार, तृतीय : छत्रपती संभाजीनगर, नूतन विद्यालय सेलू.
१९ वर्षे मुली : प्रथम:- छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रमाता सैन्यिकी स्कूल छत्रपती संभाजीनगर, व्दितीय: पुणे विभाग, ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर,
तृतीय : अमरावती विभाग, श्रीसाई मा.वि लोहारा, यवतमाळ , १७ वर्षे मुले – प्रथम:- पुणे विभाग, ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर,
व्दितीय : कोल्हापूर विभाग, आदर्श विद्यानिकेतन ज्यु.कॉलेज मिनचे, कोल्हापूर, तृतीय : छत्रपती संभाजीनगर, नूतन विद्यालय सेलू.
१७ वर्षे मुली :  प्रथम : नाशिक विभाग, श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ स्कूल नंदुरबार, व्दितीय: पुणे विभाग, भाऊसाहेब गुंजाळ पाटील ज्यु.कॉलेज संगमनेर, तृतीय: नागपूर विभाग: पोदार इंटरनॅशनल स्कूल नागपूर.टेनिस हॉलीबॉल स्पर्धेसाठी पंच म्हणून राहुल पेटकर, प्रज्वल पिळगांवकर, स्वप्निल चव्हाण, किरण घोलप, सtरज शिंदे, प्राची कडणे, मंदार कोष्टे, नीलेश माळवे, प्रदीप महाले, तर फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी दिपक वडे, अनुराग आमटी, कुणाल चव्हाण, सत्यम बरकुले, राहुल घांडगे, विशाल ढवळे यांनी काम पाहिले
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी.डी .सोन्नेकर ,के.के.देशपांडे प्रशांत नाईक, सतिश नावाडे, एस‌डी.बेंडसुरे , अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, भालचंद्र गांजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भूमकर, किशोर ढोके, एन.डी.पाटील गोपाळ आमले, मनोज वाघमारे, अनिकेत आनंदे ,  संदीप पाटील , सुजय सोळंके, कैलास कांबळे , प्रभू मोहिते, योगेश भुसारे ,राहुल रोकडे, राजेश्वर पवार, राजेश राठोड, राहुल शिंदे, नंदू चव्हाण, बाळासाहेब गोरे, बालासाहेब काष्टे , वर्षा कदम ,शुंभागी गांजापुरकर, आदिती अंबेकर, संध्या फुलपगार, रूपाली लाडाने, प्रतिज्ञा चव्हाण, कीर्ती राऊत, यमुना चव्हाण, संध्या आमटे, माधुरी कुंभार, अमृता नरके, ज्योती बिरादार, सुरेखा भांबळे, सुजाता रासवे, रूपाली चव्हाण आदींनी प्रयत्नशील परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!