गाव चलो अभियान : डॉ.संजय रोडगे यांचा सक्रिय सहभाग; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गाव चलो अभियान : डॉ.संजय रोडगे यांचा सक्रिय सहभाग; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू : लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर जिंतूर सेलू मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव चलो अभियान’मध्ये बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे यांचा सक्रिय सहभाग देत आहेत. या अभियानाद्वारे मोदी सरकारने मागील दहा वर्षात राबवलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. गाव चलो अभियानांतर्गत आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सोबतही विविध गावामध्ये नागरिकांशी चर्चेमध्ये डॉ.संजय रोडगे यांचा सक्रिय सहभाग आहे.
अभियानांतर्गत डासाळा, वाकी ,हादगाव पावडे, देवला पुनर्वसन, लाडनंद्रा, रवळगाव, मालेटाकळी ,देऊळगाव गात आदी खेडे गावातील वेगवेगळ्या घटकांशी डॉ.रोडगे संवाद साधत आहेत. यामध्ये नागरिकांशी त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. तसेच शासकीय पातळीवरील काही समस्या असतील त्याही सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करताना दिसून येत आहेत.
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक बुथ मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपच्या प्रत्येक नेत्यावर आणि कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या बुथची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही मोहिम ४ ते ११ फेब्रुवारीपर्यंत सेलू तालुक्यात राबवली गेली आहे. या मोहिमेला सेलू तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या संकल्पनेतून “गाव चलो अभियान” देशभर राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बूथ निहाय रचना, लाभार्थ्यांची भेट, महिला सबलीकरण, वैद्यकीय सुविधा, शेतकरी सन्मान योजना, अंत्योदय अशा विविध योजनांचा आढावा घेणे, विविध योजनेच्या लाभार्थीची भेट घेणे, सरकारी कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी या सर्व कर्मचार्यांची भेट घेणे. नमो अॅप डाऊनलोड करणे, नमो चषक खेळांडूची नोंदणी करणे नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा, अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करेल. अशा विविध १८ उद्दिष्टावर या अभियानात काम केले जात आहे.
तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे गेल्या दहा वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यात डॉ. संजय रोडगे हे गाव चलो अभियान दौऱ्यात देशाचे पंप्रधान नरेंद्र मोदींजी यांची लोककल्याणकारी कऱ्ये काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे गाव चलो अभियानाचे उद्दिष्ट असल्याची माहिती डॉ.रोडगे यांनी यावेळी दिली. या गाव चलो अभियानाला सर्व गावातील सामान्य जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

याप्रसंगी प्रकाश गजमल, दिपक रोडगे, प्रभाकर गजमल, संजय गटकळ, माऊली झोल, दत्तराव लाटे, दादाराव बोंबले, अनिल गजमल,बाबा बांदल, विश्वनाथ गजमल, माऊली कदम, शेख इद्रिसभाई, प्रभाकर गजमल, बाबुराव गजमल, अशोकराव गजमल, सुनील हिवाळे, दीपक गजमल, पुरी महाराज, सुभाषराव गायकवाड, दत्ता गाते, गजानन गायकवाड, शरद गायकवाड, रमेशराव गायकवाड, सदाशिव गंनगे, गणेश रोडगे,सुंदर नाना रोडगे, मधूनाना रोडगे, शिवाजी आप्पा सरोदे, संतोष रोडगे, अशोक गाडेकर, गोविंद भदर्गे, गुरुदास आळसे, रोहिदास मनेरे, सर्जेराव सपाटे, कैलास धोत्रे, सुरेश रोडगे, बंडू बप्पा रोडगे, शिवाजीअप्पा रोडगे, गुलाबराव रोडगे आदी मोठ्या प्रमणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!