संगीता सानप सेलूच्या नव्या ‘एसडीओ’; विविधस्तरातून उत्स्फूर्त स्वागत
सेलू जि.परभणी : सेलूच्या उपविभागीय अधिकारी म्हणून संगीता सानप यांनी मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला आहे. १२ जून २०२३ रोजी अरुणा संगेवार यांची बदली झाल्याने सेलूला पूर्णवेळ उपविभागीय अधिकारी नव्हते. प्रभारीवरच कामकाज सुरू होते. त्यामुळे उपविभागातील अनेक कामे खोळंबली होती. सानप ह्या जालना येथे उपजिल्हाधिकारी ( सामान्य) म्हणून कार्यरत होत्या. सरकारच्या महसूल व वने विभागाच्या वतीने सोमवारी (१२ फेब्रुवारी) सानप यांची पदस्थापनेने सेलू येथे नियुक्ती आदेश काढण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, महसूल व तलाठी संघटनेच्या वतीने मंगळवारी सानप यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार विजय मोरे, कृष्णा देशमुख, मुकुंद आष्टीकर, सारीका हेडगे, विजय बोधले, माधव कुरेवाड, रणवीरकर आदींची उपस्थिती होती.