सेलूमध्ये सकल मराठा समाजाचे जेलभरो आंदोलन; दोनशे जणांचा सहभाग
सेलू जि.परभणी : सगेसोयरे कायदा पारित करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सेलूतील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून असंवेदनशील, राक्षसी, खोके सरकारने मराठ्यांची दिशाभूल केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची वेळ आली. जरांगेंच्या जिवाला धोका निर्माण झाला असतानाही असंवेदनशील खोके सरकार दखल घ्यायला तयार नाही. यासाठी जेलभरो करण्यात आले, असे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनात सकल मराठा समाजाचे सुमारे दीडशे ते पावणे दोनशे महिला, पुरूष सहभागी झाले होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी दिली.