दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात; सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयात कार्यक्रम
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी आयोजित शुभेच्छा समारंभ आयोजिण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, संस्था सचिव डॉ.सविता रोडगे, मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, शालिनी शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यानी आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आपली वेगळी छाप उमटवली पाहिजे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हाधिकारी, आयपीएस, डॉक्टर, इंजिनिअर, वकील आदीससह आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे, अशा शुभेच्छा डॉ.रोडगे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. याप्रसंगी इयता दहावीच्या विद्यार्थ्यांना गिफ्ट देऊन नववीच्या विध्यार्थ्यानी स्वागत केले. मुलाच्या मनोरंजनासाठी विविध बैठे खेळ, शेला पागोटेचे आयोजन करण्यात आले. जान्हवी रोडगे, दिव्या निकम, ऋतुजा आघाव, संध्या शिलार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक धम्मपाल ठोके, संदीप आकात, रतन होंडे, विठ्ठल सरकटे, इंद्रजीत मोरे, शशिकांत बिहाडे, गणेश येवले, कारकर उपस्थित होते. सूत्रसंचालन रचना मोरे यांनी केले. आभार सुरभी चव्हाण यांनी मानले.