मोठी स्वप्ने साकारण्याची जिद्द बाळगा : उद्योजक आर.बी.घोडके; नूतन कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

मोठी स्वप्ने साकारण्याची जिद्द बाळगा : उद्योजक आर.बी.घोडके; नूतन कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलू जि.परभणी : विद्यार्थ्यांनी आई-वडिल, शिक्षकांचा आदर केला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहावीत. आणि ती साकारण्यासाठी परिश्रमपूर्वक जिद्द बाळगावी, असे मत प्रसिद्ध बांधकाम उद्योजक आर.बी.घोडके यांनी येथ व्यक्त केले.
सेलू येथील नूतन कन्या प्रशालेच्या स्नेहसंमेलनानिमित्त मंगळवारी आयोजित पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून घोडके बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, सचिव डॉ.व्ही.के कोठेकर, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, सतीश कुंडीकर, कैलास मलवडे, रोहिदास मोगल, दत्तराव घोगरे, माधुरी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पुरस्काराबद्दल घोडके आणि बाहेती यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून ऋतुजा रोडगे, पल्लवी आवटे, कलारत्न पुरस्कार श्रावणी उबाळे, उत्कृष्ट खेळाडू श्रुती खंदारे यांना तसेच विविध स्पर्धा व परीक्षेतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रोहिदास मोगल, सूत्रसंचालन कीर्ती राऊत, ऋतुजा रोडगे, प्रतीक्षा मोगल यांनी केले. भालचंद्र गांजापुरकर यांनी आभार मानले. सच्चिदानंद डाखोरे, शशिकांत देशपांडे, ज्योती कुंभकर्ण, यशवंत कुलकर्णी, सीमा सुकते, वैशाली चव्हाण, आर.एस.कदम, किशोर ढोके, गोविंद शिंदे, राजेश राठोड, सुरेखा आगळे, रेणुका अंबेकर, मोहन बोराडे यांच्यासह विद्यार्थिनी, पालक शिक्षकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी शंकर बोधनापोड, सुहास देऊळगावकर, बाबासाहेब थोरे, संगीता खराबे, उपेंद्र दिवाळकर, सुषमा दामा,नागेश देशमुख, विनोद शिंदे, सुनील मोगल, विजया खडके, पंडित जाधव, सपना काला ,अनंत बोराडे, निखिल झुटे, वंदना कुबरे आदींनी परीश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!