मानवत शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण ; कृषि मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थती
परभणी : राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांच्या हस्ते मानवत शहरातील विविध विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करुन उपस्थित महिलांना संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पुस्तकाचे वितरण केले. तसेच मानवत येथे आयोजित व्हॉलिबॉल व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. मानवत शहरात होत असलेल्या राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या भागवत कथा मंडपाचे भूमिपूजन मंत्री श्री.मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री श्री मुंडे यांच्या हस्ते मानवत शहरातील शिवाजी नगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर नाटकेश्वर मंदिर, दत्त मंदिर येथील सामाजिक सभागृह आणि उद्यानाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी मानवत शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन मानवत नगर परिषेदस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, परभणी महानगर पालिकेचे माजी महापौर प्रताप देशमुख, मानवत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, मानवत कृषि उत्पन बाजार समितीचे सभापती पकंज आंबेगावकर तसेच नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.