सांगली बँकेच्या रक्तदान शिबिराला मानवतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
मानवत : सांगली अर्बन बँकेच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त मानवत शहरात शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २८ जणांनी रक्तदान केले. उद्घाटनप्रसंगी बँकेचे सल्लागार डॉ.आनंद कत्रुवार डॉ.संजय मुंदडा, प्रा.गजानन अंबेकर, डॉ.सचिन चिद्रवार, प्रसाद जोशी, शाखा व्यवस्थापक प्रदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती. परभणी येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी आयोजिण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभाला शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.