Maratha Reservation : सेलू् तालुक्यात रास्ता रोको आंदोलन; सकाळपासूनच वाहतूक ठप्प
सेलू जि.परभणी : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. यामुळे सेलूकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वालूर, कुंडी पाटी, पाथरी रेल्वे गेट सेलू, हादगाव पावडे, मोरेगाव, देवगाव फाटा, गोगलगाव पाटी या ठिकाणी सकाळी रास्तारोको आंदोलन सुरू झाले. या वेळी ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण’ ‘आमच्या हक्काचे…’ अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला आहे.