उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखू : रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात 

सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की ; शिक्षकांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. शालेय स्मृती जागवत शाळेचा निकाल दरवर्षी १०० टक्के आहे. यावर्षीही आमची बॅच शाळेच्या उत्कृष्ट निकालची परंपरा कायम ठेऊ. हे आमचे दायित्व ठरले आहे.

डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र देत प्रोत्साहित केले व उज्‍ज्वल यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.मंचावर संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे उपस्थित होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी समारंभाचे संयोजन केले. नववीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. अल्पोपहाराची करण्यात सोय आली होती. या वेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रुती हाडुळे, स्नेहल लंगडे यांनी केले, तर आभार आदित्य साखरे, अथर्व नंद यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!