अधिष्ठातापदी डॉ.सदानंद भिसे यांची निवड; सोलापूरच्या डॉ.वेशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात स्वागत

अधिष्ठातापदी डॉ.सदानंद भिसे यांची निवड; सोलापूरच्या डॉ.वेशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात स्वागत

गंगाखेड जि. परभणी : परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैधकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सदानंद भिसे यांची सोलापुर येथील डॉ.वेशंपायन वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठतापदी निवड करण्यात आली.
बुधवारी डॉ.भिसे यांनी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ.भिसे मूळचे गंगाखेड येथील असून परभणी येथील नूतन विद्या मंदिर व ज्ञानोपासक महाविद्यालयात त्यांचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण झालेले आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई येथील सर जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयात व तेथून येथून परभणी शासकीय महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली होती.ज्ञत्यांनी राज्य अवयव प्रत्यारोपण समिती प्रमुख म्हणून ही काम पाहिले आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे सलग तीन वर्ष महाव्यवस्थापकपदी कार्यरत होते. डॉ.भिसे यांच्या निवडी बद्दल परभणी शहरात विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!