जिंतूरच्या विलासराव देशमुख उर्दू शाळेचे वार्षिक स्नेसंमेलन उत्साहात; माजी आमदार विजय भांबळे यांची उपस्थिती
जिंतूर जि.परभणी : येथील विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेसंमेलन उत्साहात पार पडले.उद्घाटक म्हणून माजी आमदार विजयराव भांबळे उपस्थित होेते. प्रमुख पाहुणे मौलाना जलील साहब, संस्थापक अध्यक्ष आसेफोद्दिन काझी साहब, मुख्याध्यापक अहेमद सिद्दीकी साहब, वासेफोद्दिन काझी साहब उपस्थित होते. भांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यानी विविध क्रीडा, कलागुण, छंद जोपासले पाहिजे. विद्यार्थ्यांनी भाषण, संगीत, नृत्य, चित्रकला, नाट्य इत्यादी क्षेत्रात पदार्पण करावे. अपलसंख्याक समाजातील अनेक दिग्गज राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकले. त्यामुळे आपण स्वतःला कमी समजू नये असा सल्ला देखील दिला. तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासनाने पुढाकार घेत त्यांना वसतिगृह, ग्रंथालय सुविधा द्याव्यात, शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी व शिक्षणासाठी प्रेरित करावे,असे मत व्यक्त केले.
या वेळी मौलाना सिराज साहब,नरामराव उबाळे, शोएब जनिमिया, शाहेद बेग मिर्झा, मनोहर डोईफोडे, अहेमद बागबान, मनोज थिटे, मेहराज सर शेख सर राहुल घुले, रियाज चाऊस, शाहेद सिद्दीकी इत्यांदिसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.