छत्रपती शिवाजी महाराज जयंती : सेलूतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : सेलूतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

सेलू येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. भारता माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आदींच्या उंच प्रतिमांसह वाहने सजवलेली होती. ढोल पथक, संबळ पथक, हलगी पथक, मर्दानी खेळ तसेच युवती व मुलींच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले. नागरिक, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : सेलूतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

सेलू जि.परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरात विविध भागात सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या वतीने सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. दत्तनगर येथून सकाळी अकरा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार विजय भांबळे, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, पवन आडळकर, संजय साडेगावकर, संयोजक रघुनाथ बागल, सुधाकर रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिमा पूजनानंतर ढोल ताशांच्या निनादात शहरातील मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात समारोप झाला. पुरुषोत्तम पावडे, प्रकाशराव मुळे, विनायक पावडे, गोरख भालेराव, रमेशराव डख, रमेश शिंदे, आनंद डोईफोडे, मनीष कदम, चंद्रकांत गाडेकर, विशाल देशमुख, शिवराम कदम, उदय रोडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमेची जल्लोषात  पालखी मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्याचा मोठा सहभाग होता. प्रशासनाच्या वतीने सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मारोती चव्हाण, मुख्याधिकारी देविदास जाधव, मिलिंद सावंत, प्रभाकर सुरवसे, मनीष कदम, रमेश दौड, सचिन कोरडे, गौतम धापसे, बबन गायकवाड, मलिकार्जुन स्वामी, नितीन  इजाते, सुरवसे, चाऊस, खान आदींंसह मान्यवरांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : सेलूतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!