सेलूमध्ये शिवजयंती मिरवणूक; पालखी मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह

सेलूमध्ये शिवजयंती मिरवणूक; पालखी मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह

सेलूमध्ये शिवजयंती मिरवणूक; पालखी मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह

 

सेलू जि.परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त सेलू शहरात विविध भागात सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. नूतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिवजयंती समितीच्या वतीने महाविद्यालयापासून जल्लोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली.

दत्तनगर येथून रघुनाथ बागल यांच्या संयोजनामध्ये सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणुकीला सुरुवात झाली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार विजय भांबळे, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, पवन आडळकर, संजय साडेगावकर, संयोजक रघुनाथ बागल, सुधाकर रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिमा पूजनानंतर ढोल ताशांच्या निनादात शहरातील मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात समारोप झाला. पुरुषोत्तम पावडे, प्रकाशराव मुळे, विनायक पावडे, गोरख भालेराव, रमेशराव डख, रमेश शिंदे, आनंद डोईफोडे, मनीष कदम, चंद्रकांत गाडेकर, विशाल देशमुख, शिवराम कदम, उदय रोडगे, सचिन शिंदे, पंकज चव्हाण, कैलाशराव मोगल, जीवन आवटे, माणिक काजळे, कारके महाराज, माऊली पवार, मंचक अंभूरे, अक्षय कदम, गोटू धापसे, अनिल वाटोडे, धीरज कदम, विष्णू बागल, संतोष ठाकूर, गजानन बागल, शिवाजी गिनगीने, नंदू काष्टे, महादेव काळदाते आदींंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नूतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिवजयंती समितीच्या वतीने महाविद्यालयापासून जल्लोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. माजी आमदार विजय भांबळे यांनी प्रतिमा पूजन केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सेलूमध्ये शिवजयंती मिरवणूक; पालखी मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!