सेलू येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात; श्रीराम कॉलनीमध्ये मिरवणूक

सेलू येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात; श्रीराम कॉलनीमध्ये मिरवणूक

सेलू जि.परभणी : सेलू येथील बंजारा बांधवांच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी श्रीराम कॉलनी भागात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी बंजारा पारंपरिक वेशभूषा परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बंजारा सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. पुरुषांनी बंजारा लेंगी नृत्त्य सहगायन करून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले.
केले. या वेळी निवृत्त शिक्षणाधिकारी पांडुरंग चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांचे जीवन चरित्र सांगून मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या प्रवाहातून समाज गतिमान झाला पाहिजे, जानजो, छानजो अन् पच मानजो या त्रिसूत्रीची जीवनात अमंलबजावणी करून उज्वल भविष्याचा हा पाया रचला पाहिजे आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले. महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला. शहरातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!