माणकेश्वर येथील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश
परभणी : जिंतूर तालुक्यातील मौजे माणकेश्वर येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला. यामध्ये प्रभाकर शेळके, शिवाजी शेळके, रामप्रसाद डाखोरे, संतोष डाखोरे, संतोष साबळे, शेकुराव शेळके, विठ्ठल साबळे, ज्ञानेश्वर डाखोरे, तुळशीराम घाटे, आश्रोबा शेळके, नागोराव शेळके, मारुती डाखोरे, बंडू शेळके, भागवत ठाकरे, कृष्णा डाखोरे, विश्वनाथ डाखोरे, गणेश डाखोरे, समा शेळके, मदन डाखोरे, सिताराम शेळके, छत्रगुण शेळके आदींचा समावेश आहे. माजी आमदर विजय भांबळे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भांबळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. पुढील निवडणुकीसाठी सर्व ताकतीने कामास लागून शरदचंद्रजी पवार यांचे विचार व विकास तळागळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. या वेळी माधव घोगरे व तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.