सेलूतील न्यू हायस्कूलमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात
सेलू जि.परभणी : येथील न्यू हायस्कूलमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. इयत्ता बारावी कला शाखेतील ५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले असून अकरा वी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे नियोजन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य के.व्ही.मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक डी.यू.भागवत, एस.एस.मगर, प्रा.निकम बी.बी., प्रा.कुलकर्णी एस.डी.,प्रा.सावंत ए.एस, मंजुषा बोराडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात स्व.विनायकरावजी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. पूनम हजारे यांनी स्वागत गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी निरोप प्रसंगी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करुन विद्यालयाचा नावलौकीक वाढविण्याचे आवाहन पर्यवेक्षक डी.यू.भागवत यांनी केले. तर प्रा.निकम बी.बी.यांनी कॉपीमुक्त परीक्षा देण्याचे अवाहन केले तसेच प्रा.सावंत ए.एस यांनी संत तुकारामाच्या अभंगाच्या ओळीतून मार्गदर्शन केले. प्रा.कुलकर्णी एस.डी.यांनी कवी विं.दा.करंदीकर यांच्या काव्यरचनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपप्रसंगी विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देताना विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवण्याचे अवाहन प्राचार्य के.व्ही.मोरे यांनी कले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक एस.डी.मोरे यांनी सहकार्य केले. अंजली नाटकर यांनी आभार मानले.