सेलू, जिंतूर मतदार संघात सर्वाधिक ३२५२ घरकुलांची मंजुरी : आमदार मेघना बोर्डीकर; सेलूमध्ये लाभार्थ्यांना निधी पत्र वाटप कार्यक्रम
सेलू जि.परभणी : येथील रवळगाव सर्कलमधील पात्र लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मोदी आवास योजनेची निधी मंजुरी मिळाल्याचे पत्र वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी विद्याविहार संकुल येथे पार पडला. या वेळी बोलतांना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाला हक्काचे पक्के घर असावे हे स्वप्न पाहीले. ते पूर्ण होतांना दिसत आहे. परभणी जिल्ह्यातील ४८०० पैकी जिंतूर-सेलू मतदार संघात सर्वाधिक ३२५२ घरकुलांची मंजुरी मिळाली याचे निश्चितच समाधान आहे.”
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मोदी आवास योजनेची निधी मंजुरी मिळाल्याचे पत्र आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, सोन्नेकर महाराज, माजी सभापती रवि डासाळकर, संचालक तथा भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता कदम, माऊली ताठे, केशव सोळंके, अनिल पवार, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश काटकर, भाजपा शहराध्यक्ष अशोक अंभोरे, रवळगाव सरपंच दीपक रोडगे, दादाराव बोंबले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बोर्डीकर म्हणाल्या की; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत अर्थसंकल्पामध्ये “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजने” अंतर्गत १० लाख घरकुलाची घोषणा केली. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ४८०० पैकी जिंतूर-सेलू मतदार संघात सर्वात जास्त एकूण ३२५२ घरकुलांची मंजूरी गृहनिर्माण, बहुजन कल्याण व इतर मागासवर्ग विभागाचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी आपल्या खात्याच्या मंत्रालयातून तात्काळ मंजूरी दिली. ही बाब खूप महत्वाची आहे. तसेच इतर मागास प्रवर्गासाठी “मोदी आवास घरकुल योजने” अंतर्गत आपल्या अनुदानाचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. आपण आयुष्यभर निष्ठेने केलेले कार्य निश्चितच आपल्या आणि समाजाच्या हिताचे राहीले आहे. डॉ.संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.संजय रोडगे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षापदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दत्ता तांबे यांनी केले. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी केले. तर आभार दीपक रोडगे यांनी मानले
.