मानवतची ‘केंद्रिय कन्या शाळा’, केरवाडीची ‘संत ज्ञानेश्वर’ ठरल्या सर्वात ‘सुंदर’ 

मानवतची ‘केंद्रिय कन्या शाळा’, केरवाडीची ‘संत ज्ञानेश्वर’ ठरल्या सर्वात ‘सुंदर’ 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा परभणी जिल्हास्तरीय निकाल जाहीर, सहा शाळा ठरल्या बक्षीसपात्र

जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या दोन शाळांना प्रत्येकी ११ लाख, तर द्वितीय आलेल्या दोन शाळांना प्रत्येकी ५ लाख आणि तृतीय आलेल्या दोन शाळांना प्रत्येकी ३ लाख अशा ६ शाळा ३८ लाखाच्या बक्षीसासाठी पात्र ठरल्या आहेत. दरम्यान, खाजगी संस्था गटातील गुणानुक्रमे पहिल्या पाच शाळांची शनिवारी मुख्यकार्यकारी अधिकारी विनय मून यांनी स्वतः क्रॉस तपासणी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

मानवतची 'केंद्रिय कन्या शाळा', केरवाडीची 'संत ज्ञानेश्वर' ठरल्या सर्वात 'सुंदर' 

परभणी : शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा या अभियानाचा जिल्हास्तरीय मूल्यांकनाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मानवत आणि खाजगी संस्था गटातून संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी या शाळा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकावर आल्या आहेत. या दोन्ही शाळा प्रत्येकी ११ लाख बक्षीसास पात्र झाल्या आहेत. 

शालेय शिक्षण विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले होते.विशेषतः यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता, स्वछता, आरोग्य ,पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता ,भौतिक सुविधा या बाबीचा सामावेश होता.सहभागी शाळांचे प्रथमतः मुख्याध्यापकांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली.दुसऱ्या टप्यात केंद्रप्रमुखांच्या समीतीने निकषपूर्ण मूल्यांकन करताच तिसऱ्या टप्प्यात तालुकास्तरीय गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या समीतीने केंद्रस्तरावर जिल्हा परिषद व खाजगी संस्था गटातून प्रथम आलेल्या शाळेमधून दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी मूल्यांकन करून ऑनलाईन गुणांकन पूर्ण केले. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून जिल्हा परिषद १ व खाजगी संस्था १ याप्रमाणे जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने ९ जिल्हा परिषद व ९ खाजगी संस्थेच्या शाळांचे मूल्यांकन केले. या जिल्हास्तरीय समितीने शनिवारी निकाल जाहीर केला. यामध्ये दोन्ही गटातून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन शाळांची म्हणजे दोन्ही गटातून ६ शाळांची निवड करण्यात आली आहे. यापैकी प्रथम क्रमांच्या शाळा ह्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या असून शनिवारी या दोन्ही शाळांची विभागीय समीतीकडून तपासणी करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात दीड महिन्यात बहुतांश शाळेचे रूपडे बदलले असून शाळा व्यवस्थापन समीती, माजी विद्यार्थी, पालक यांचे सामाजिक दायित्वाची जोड लागली. ही एक प्रकारे या अभियानाची फलश्रुती म्हणता येईल.

जिल्हास्तरीय निकाल असा :

खाजगी संस्था गट –

प्रथम : संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी(ता.पालम),द्वितीय : रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी (ता.परभणी) तृतीय : शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूर (ता.सेलू)

जिल्हा परिषद गट –

प्रथम : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा मानवत,द्वितीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव (ता.गंगाखेड) ,तृतीय : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगव्हाण (ता.पाथरी)

जिल्हास्तरीय मूल्यांकनात सहभागी शाळा 

खाजगी संस्था गट : संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी, रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी,शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूर, जवाहर विद्यालय जिंतुर,शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी,विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूल पूर्णा, मा.रत्नाकरराव गुट्टे इंटरनॕशनल स्कूल वडगाव, राजमाता जिजाऊ माध्यमिक आश्रमशाळा राणी सावरगाव,श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय मानवत.

जिल्हा परिषद गट : 

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा मानवत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आव्हई (ता.पूर्णा) ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खवणे पिंपरी(ता.सेलू) ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी (ता.परभणी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाव्हा(ता.पालम),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव (सोनपेठ),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी म्हाळसा (ता.जिंतूर)

जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती अशी  : 

अध्यक्ष : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, डाएटचे प्राचार्य विकास सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, योजना शिक्षणाधिकारी संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, जिल्हा समन्वयक गणराज यरमळ, डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रल्हाद खुणे, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, शौकत पठाण, डी.एल.रणमाळे, टी.एस.पोले, डी.डी.साबळे, विस्तार अधिकारी, बी.व्ही.कापशिकर, लेखाधिकारी अमोल आगळे, नारायण भोसले, डी.एल निलपत्रेवार, डाएटचे अधिव्याख्याता नितीन जाधव, अनिल जाधव, रामा नाईकनवरे यांचा सामावेश होता.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!