क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट राहा : डॉ.प्रियांका वाघमारे; नूतन कन्या प्रशालेत दहावीच्या विद्यार्थिनींना निरोप

क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट राहा : डॉ.प्रियांका वाघमारे; नूतन कन्या प्रशालेत दहावीच्या विद्यार्थिनींना निरोप

सेलू जि.परभणी : विद्यार्थिनींनो सातत्याने अभ्यास करा,नम्र रहा. विचार आचार चांगले कसे असतील याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे. क्षेत्र कोणतेही निवडा पण त्यात सर्वोत्कृष्ट राहा, असे मत डॉ. प्रियांका वाघमारे यांनी व्यक्त  केले.
येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत दहावीच्या विद्यार्थिनींनीसाठी आयाजित शुभेच्छा समारंभप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्रियांका वाघमारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापिका उज्वला लड्डा, होत्या. उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थिनींनी नाटिकेद्वारे सर्वांचे स्वागत केले. डॉ.प्रियांका वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दत्तराव घोगरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुहास देऊळगावकर यांनी दिला. याप्रसंगी राधिका भाबट, शुभदा कुलकर्णी, समीक्षा कंधारकर, भाग्यश्री गायकवाड, प्रतीक्षा मोगल, दीक्षा खरात या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. उपेंद्र दिवाळकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांनी केला. सूत्रसंचालन सुरेखा आगळे यांनी, तर  भालचंद्र गांजापुरकर यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!