सेलूतील गुलमोहर कॉलनीमध्ये शब-ए-बरात जलसा उत्साहात; सुलेमानिया मस्जिदमध्ये कार्यक्रम
सेलू जि.परभणी : शहरात रविवारी रात्री शब-ए-बरात मुस्लिम समुदायाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील सर्व मस्जिदमध्ये धार्मिक कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुलमोहर कॉलनी येथील सुलेमानिया मस्जिदमध्ये रात्री उशिरापर्यंत नमाज अदा करण्यात आली. बडी रात निमित्त दरवर्षी प्रमाणे मदरसाचा वार्षिक कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नूर मोहंमद ईशानी होते. याप्रसंगी मौलना वहाबसहाब नदवी, पठाण यामिन खान. निसार अहेमद,अबूजर शेख अकबर, मोहमंद जाकेर, मोहमंद महेमूद अन्सारी, शेख फरहान, शेख सलीम यांना यावेळी कुराण देऊन शकील भाई, गौस भाई अन्सारी, जमा खान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
मौलाना वहाब नदवी म्हणाले, की इस्लामी कलेंडर नुसार शाबान महिन्याच्या पंधरा तारखेला शब -ए डबरात साजरी करण्यात येते. बरात म्हणजे मुक्त होणे असा अर्थ होतो. या रात्री गुन्हेगारांना मुक्ती मिळते व रात्री अल्लाह आपल्या भक्तांना विचारतो आहे. कोणी क्षमा मागणारा मी त्याला क्षमा करायला तयार आहे. या रात्री दया व रहेमंतचा पाऊस पडतो या रात्रीचे महत्व विषद करताना प्रेषित मोहमद पैगम्बर यांनी नमूद केले आहे की, याच रात्री आयुष्य, रोजगार व भाग्य लिहिल्या जाते जगात कोण जन्माला येईल कोणाचं मृत्यू होईल कोणाला ससार सोडावे लागेल, कोणच लग्न होईल हे सुद्धा निश्चित केले जाते शब ए बरात चे महत्व या वेळी त्यांनी विषद केले शाबान महिन्या नंतर रमजान महिन्यास सुरवात होणार आहे ११ मार्चपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे. सर्वानी पाच वेळा नमाज, रोजा, जकात, तराबीह करावी कार्यक्रमाच्या अखेरीस दुवा करण्यात आली. विश्वामध्ये चैन अमनची दुवा करण्यात आली. या वेळी हाजीयुन्नूस कुरेशी, हाजी मोईनभाई बागवान, हाजी निसार पठाण, अनिस कुरेशी इंजिनिअर,अली मोहमद ईशानी, रशीद खान, रहीम कादरी टेलर, सयद जावेद, शेख इजहार , गौस तांबटकरी, शेख मौजम सर, सत्तार भाई बागवान, कदीर भाई बागवान,हकीम कादरी, शेख हुसेन आदींची उपस्थिती होती