‘राजस्थानी मल्टिस्टेट’वाले नॉट रिचेबल; चंदुलाल बियाणी आणि कंपनीचा कोट्यवधींवर डल्ला मारण्याचा डाव; सेलूतील ग्राहक, ठेवीदारांतून तीव्र संताप

‘राजस्थानी मल्टिस्टेट’वाले नॉट रिचेबल; चंदुलाल बियाणी आणि कंपनीचा कोट्यवधींवर डल्ला मारण्याचा डाव; सेलूतील ग्राहक, ठेवीदारांतून तीव्र संताप

परळी येथील चंदुलाल बियाणी यांच्या राजस्थानी मल्टीस्टेटमध्येही मराठवाड्यातील गोरगरीबांच्या ९०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. परंतू मराठवाड्यासह बाहेरील शाखाही गेल्या तीन महिन्यापासून बंद आहेत. चंंदुलाल बियाणी यांची एकही अधिकृत प्रतिक्रिया ठेवीदारांपर्यत पोहोचली नाही. किंवा शाखा अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनाही तोंडातून ब्र काढला नाही. याव्दारे गोरगरीबांच्या कष्टाच्या कोट्यवधींच्या ठेवीवर डल्ला मारण्याचा विचार चंदुलाल बियाणी आणि कंपनीचा आहे, असा आरोप ठेवीदारांकडून केला जात आहे.

सेलू जि.परभणी : बीड येथील सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी पाठोपाठ अवघ्या सहा महिन्यात सेलूतील भोळ्याभाबड्या, गोरगरिब सामान्य जनतेला तसेच अनेक व्यापाऱ्यांना, ठेवीदारांना परळी येथील चंदुलाल बियाणी यांच्या राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने कोट्यवधींचा चुना लावून मोठी फसवणूक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अध्यक्ष चंदुलाल बियाणी आणि सेलूतील शाखा अधिकारी नंदकिशोर सोमाणी यांचा मोबाईल बंद आहे. शाखा कुलप बंद आहे. या बॅंकेचे स्थानिक सल्लागार मंडळातील सदस्यांनी चुप्पी ठेवली आहे.  ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी अध्यक्ष चंदुलाल बियाणी, शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी तसेच सल्लागार मंडळातील सदस्य यांच्या विरूद्ध फौजदारी कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर ठेवीदारांसह हजारो खातेदार चिंताग्रस्त झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचा चुना लावून राजस्थानी मल्टिस्टेटचे अध्यक्ष फरार झाल्याची चर्चा आहे, तर शाखा अधिकारी नंदकिशोर सोमाणी सेलू शहरात उजळ माथ्याने फिरत आहे. पण तोंडातून ब्र काढायला तयार नाही. कोणाला बोलायला तयार नाही. माझे काही देणे घेणे नाही अशा अहंकारात वागणूक देऊन ठेवीदारांशी संपर्क साधायला तयार नाही. त्यामुळे आधी शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी यांच्यासह स्थानिक सल्लागार मंडळाला जाब विचारण्याच्या तयारीत ठेवीदार आहेत. ठेवीदरांमध्ये संभ्रमाचे आणि कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅंकेचे अधयक्ष चंदुलाल बियाणी व सेलू शाखा अधिकारी नंदकिशोर सोमाणी यांचा मोबाईल नॉट रिचेवल आहे. त्यामुळे ग्राहक , ठेवीदारातून संताप व्यक्त केला जात आहे. ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्या प्रकरणी अध्यक्ष चंदुलाल बियाणी, शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी तसेच सल्लागार मंडळातील सदस्य यांच्या विरूद् फौजदार कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

१२ फेब्रुवारी रोजी सेलू येथील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी शाखांसमोर बीड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी जोरदार आंदोलन केले. या वेळीही शाखा अधिकारी नंदकिशोर सोमाणी यांचा फोन बंद आढळून आला. माजी सभापती अशोक काकडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन ठेविदारांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. दरम्यान, ‘ज्ञानराधा’सह ‘राजस्थानी’च्या ठेवीदारांनी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सेलू् येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत कैफियत मांडली. बोर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ज्ञानराधा व राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या ठेवी तातडीने परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा.सचिन उबाळे, शिवप्रसाद काबरा, श्रीनिवास बाहेती, प्रकाश पाचलेगावकर, केदार कर्वा, जगदीश राठी, ॲड.मुकुंद गजमल आदींसह ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!